संगीत साहित्यातून उमटतील आदिवासी संस्कृतीचे सूर..!
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांनी आदिवासी समाजबांधवाना दिला मदतीचा हात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ करंजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांच्या पुढाकाराने २१ तारखेला ग्रामसभेत मंदिर बांधकामाबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार २८ तारखेपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आले. या उपक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांनी करंजी येथील आदिवासी समाजातील निर्मल माता ग्रुप ला मदतीचा हात देत संस्कृती जोपासण्याचे औदार्य दाखविले.
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांच्या पुढाकारातुन आदिवासी समाजातील निर्मल माता ग्रुपला स्वखर्चातून साऊंड सिस्टम, पेटी तबला व इतर साहित्य भेट देण्यात आले. या संगीत साहित्यातून आदिवासी संस्कृतीचे सुमधुर सर उमटतील, यात शंका नाही. यासाठी समाजबांधवानी सामाजिक कार्तकर्ते प्रदीप खोब्रागडे यांचे मनपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी सारनाथ बक्षी, हरमेल डांगी, विशाल कोडाप, भिवसन आत्राम, सुमित तेलसे,निळकंठ नेवारे ,अंकुश गोहणे, गोलू चापले सुशील,सुमन जेंघठे , रेखा राठोड, मैनाबाई देउरमले, माया आत्राम, शीतल टेकाम, अनुबाई आत्राम, गंगू चौधरी, कमल रामगिरवर, मंजुबाई पोहनकर, झाराबाई चांदेकर, वंदना खोब्रागडे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
गावाचा विकास हा माझा व्ययक्तिक विकास नाही, तर हे माझे सामूहिक ध्येय आहे. गावातील समस्त समाजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.
*_प्रदीप खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते, करंजी*



