आई-वडिलांच्या आशीर्वादाने वैद्यकीय अधिकारीपदाचा मान
डॉ. सौरभच्या यशाचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोपरगाव, तालुका शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सौरभ वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होत असल्याने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद आणि अथक परिश्रम हेच प्रमुख बळ असल्याचे सौरभने कृतज्ञतेने नमूद केले आहे. त्याचे वडील विलास नत्थूजी ढुमणे, तर आई सौ. लीला विलास ढुमणे, माजी नगरसेविका आहेत. आई-वडिलांनी दिलेले संस्कार, प्रेम, पाठबळ आणि शिक्षणासाठी घेतलेली मेहनत यामुळेच आपण हा टप्पा गाठू शकलो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासात माधुरी रामटेके, शालिनी चव्हाण, पांडुरंग आंबटकर (चेअरमन, सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स), ॲड. अझर कुरेशी, डॉ. इमरान, नितेशकुमार, डॉ. पंकज कविश्वर, डॉ. शीतलकुमार सोनवणे, महेंद्र रामटेके, प्रवीण दिघोरे आणि पंकज भासमे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याचे त्याने सांगितले.
तसेच विलास केबल नेटवर्क मित्रपरिवार, गौतम नगर वॉर्डवासी तसेच अशोक डोंगे (बाबा), सिंधू ढुमणे (आजी), नारायण डोंगे (मामा), महेश मोरे (सरपंच), अतुल कोल्हे, अनिल पडोळे (नगरसेवक) आणि तन्नय चिकटे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याने विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महाविद्यालयीन जीवनात शुभम कांडळकर, योगेश निकाळे, उज्ज्वल सोनवणे, साक्षी काकडे, गायत्री वैद्य, पार्नवी खडकर आणि निलम मॅडम यांचीही मोलाची साथ लाभली. तर सूरज डाकरे यांनी वैयक्तिक तसेच शैक्षणिक प्रवासात सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे सौरभने नमूद केले.
वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्या जबाबदारीची सुरुवात करताना समाजातील गरजू रुग्णांना संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे सेवा देण्याचा आदर्श जपण्याची अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त होत आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक आणि भद्रावती करांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



