ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोरगावात घराजवळ आला वाघ ; महिलेचा उडाला थरकाप.!

भांडे घासत असताना शेजारीच दिसला वाघ ; नागरिकांची गर्दी होताच नाल्यातून जंगलाच्या दिशेने पलायन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी :_ तालुक्यातील बोरगाव येथे घराच्या अगदी जवळ वाघ आल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पूजा गौतम चांदेकर या घराच्या अंगणात भांडे घासत असताना त्यांना शेजारीच मोठा वाघ बसलेला दिसला.

अचानक समोर वाघ दिसल्याने घाबरलेल्या पूजा चांदेकर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घरात धाव घेत स्वतःला घरात बंद करून घेतले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली.

नागरिकांची मोठी गर्दी झाल्यानंतर काही वेळाने वाघ बाजूच्या नाल्यातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. घराच्या अंगणापर्यंत वाघ आल्याने बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बोरगावातील नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये