ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या मार्गाचा अंगीकार करणे काळाची गरज

ज्येष्ठ साहित्यिक अरुण झगडकर यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ स्थानिक स्व. लक्ष्मणराव ज. कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या विचारांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी चौधरी हिने केले. प्रास्ताविक प्राध्यापक हुलके सर यांनी केले. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण झगडकर सर यांचा महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले.

विद्यार्थ्यांनी गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही तत्त्वे आपल्या जीवनात आचरणात आणावीत. तसेच भविष्यात घडविण्यासाठी भरपूर वाचन व चिंतन करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता असून, त्यासाठी सातत्याने अभ्यास, वाचन व आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप वाघमारे सर होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये आदर्श निर्माण व्हावा, त्यांच्यात चांगले संस्कार रुजावेत आणि ते भविष्यात उत्तम नागरिक म्हणून घडावेत, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल आणि भविष्यात प्रगती करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुप पल्कुटवार यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सातारे, बावने, सांस्कृतिक विभागप्रमुख टोंगे, निमगडे, बडवे या प्राध्यापकवृंदासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये