ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळाने घेतला शेतकरी बांधवाचा बळी

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते गजानन दुर्योधन यांच्या निधनाने गोंडपिपरीत हळहळ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गोंडपिपरी येथील पंचशील वॉर्डातील ६५ वर्षीय शेतकरी गजानन देमाजी दुर्गोधन यांनी शेतातील बोडीमध्ये आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गजानन दुर्गोधन हे कापूस व धान पिकांची शेती करत होते. यावर्षी पावसाअभावी तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. शेतीचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि भविष्यातील चिंतेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गजानन दुर्गोधन यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कष्टकरी आणि शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्येही तीव्र संताप व हताशा व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि सरकारी मदतीचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत, पीकविमा नुकसानभरपाई आणि दुष्काळग्रस्तांसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

*आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते..!*

गजानन दुर्योधन हे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते होते. स्थानिक पंचशील प्रभागातील बौद्ध विहाराच्या विविध उपक्रमात त्यांनी हिरारीने सहभाग घेतला होता. तसेच तालुकास्तरावर झालेल्या विविध सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये