पो.स्टे. कारंजा अप.क्र. ३८२/२४ क. ३७६ (३) (एन), ३७६ (अव) भादवि सह ४, ६ पोक्सो मधील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विद्यमान मा. श्रीमती अन्सारी मॅडम डि.जे.३ जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी अप.क्र. ३८२/२४ क.३७६ (३) (एन), ३७६ (अब) भादवि सह ४, ६ पोक्सो मध्ये आरोपी भिमराव खुशाल पाटील, उर्फ भन्तेजी, वय ५५ वर्ष रा.लोहारी सावंगा ता. नरखेड जि. नागपूर यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम ३७६ (३), ३७६ (अव) भादवि सह ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २००००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा.
घटनेचा थोडक्यात तपशील :- आरोपी हा बौध्द विहार काकडा ता. कारंजा (घाडगे) येथे भन्तेजी म्हणून राहत होता. यातील अल्पवयीन पिडीत मुलगी हिला आरोपी याने विहाराच्या मागच्या रूममध्ये बोलावून दार बंद करून पिडीत हिचे छातीला चावा घेवून पिडीतेसोबत लैगीक अत्याचार केला. पिडीत मुलीची आई फिर्यादी हिचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कारंजा अप.क्र. ३८२/२४ क.३७६ (३) (एन), ३७६ (अब) भादवि सहकलम ४, ६ पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. धनश्री कुटेमाटे यांनी करून मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. प्रसाद सोईतकर यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना सफौ पंचम कोटगिरवार, ब.नं.४७० यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच ठाणेदार पो.स्टे. कारंजा पो.नि. श्री. प्रल्हाद मदन यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावि साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. विद्यमान मा. श्रीमती अन्सारी मॅडम डि.जे.३ जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी गुन्ह्यातील फिर्यादी व पिडीत तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष तपासून व उपलब्ध पुरावे यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३७६ (३), ३७६ (अ.ब) भादवि सह ४, ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २००००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी),पोलीस निरीक्षक, स्था.गु.शाखा वर्धा



