स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे मोहा दारूची निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारावर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील गावठी दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने गावठी दारू निर्मीती करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील मौजा गोहदा शिवारातील स्मशानभूमी जवळ बोर नदीपात्रात गावठी मोहा दारू निर्मीती करणाऱ्या आरोपींवर कारवाई करीत 3,200 ली. मोहा सडवा रसायण, ड्रम सह जु.कि. 6,60,000 रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, गावठी मोहा दारूची निर्मीती करणारे गुन्हेगार नामे आनंद राय व आशिष राय रा. हिंगणी यांचेविरूध्द पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, सागर भोसले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



