Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संवाद प्रतिष्ठानला रुग्णवाहीका लोकसेवार्थ समर्पित

श्रीमती चंद्रभागाबाई नामदेवपाटील वासाडे मेमोरियल सोसायटीतर्फे भेट

चांदा ब्लास्ट

श्रीमती चंद्रभागाबाई नामदेवपाटील वासाडे मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरतर्फे संवाद प्रतिष्ठानला रुग्णवाहिका लोकसेवार्थ समर्पित करण्यात आली. या रुग्णवाहीकेचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. संवादने माणसांची मने जोडण्यासोबतच लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली आहे. ते कौतुकास्पद आहे, असे आमदार धानोरकर यावेळी म्हणाल्या.
चंद्रपुरातील शंकुतला फार्म येथे काल संवाद प्रतिष्ठानच्यावतीने कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी या रुग्णवाहीकाचावी वासाडे परिवाराच्यावतीने संवाद प्रतिष्ठानकडे सुर्पद केली. शहरातील ही एकमेव अद्यवात रुग्णवाहीका आहे. यावेळी श्रीमती चंद्रभागाबाई नामदेव वासाडे मेमोरियल सोसाटीचे अध्यक्ष चंदू वासाडे, त्यांच्या पत्नी मिना वासाडे, भाजपनेते देवराव भोंगळे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक वैशालीताई वासाडे, सीमा सुधाकर अडबाले, प्रा.विजय बदखल, दीपक जेउरकर, सुधीर ठाकरे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय बदखल यांनी केले. संवाद प्रतिष्ठानच्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद केली. संवादामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी एकत्र आली. या एकत्रित शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी होत आहे, असे देवराव भोंगळे म्हणाले. यावेळी संवाद प्रतिष्ठानच्यावतीने चंदू वासाडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आली. रुग्णवाहीका अत्यंत वाजवी दरात गरजवंतांना उपलब्ध राहील. येत्या काही महिन्यात चंद्रपुरात विदर्भातील सर्वात मोठी रक्तपेढी संवाद प्रतिष्ठानच्या माध्यमा्तून उभी करण्याचा माणस वासाडे यांनी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केला. व्यक्त केला.
तत्पूर्वी संवाद प्रतिष्ठानच्या या कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात वेगवेगळ्या कलागुणांची उधळण करण्यात आली. कार्यक्रमाला डाॅ. चेतन खुटेमाटे, डॅा. सुधीर मत्ते, डाॅ. सौरभ राजुरकर, डॅा.अनुप वासाडे, डॅा. सचिन धगडी, डाॅ. विनोद मुसळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राहूल बदखल, अमित येरगुडे, अजय बल्की, मंगल बल्की, संजय ढवस, वनाधिकारी संतोष थिपे, विनायक धोटे,अशोक सोन्टक्के, प्रा. राजेश पेचे, दीपक खामनकर, अशोक मत्ते. डाॅ. धीरज लांबट, डॅा.अाशिष पोडे, डॅा. निखिल टोंगे, डॅा. गणेश कौरासे, रमेश आगलावे, शामकांत थेरे, उमाकांत धांडे, संतोष कुचकर, दत्तात्रेय भोयर , भाऊराव झाडे, नरेंद्र बोबडे, सुरज कुमार बोबडे,एकनाथ खिरटकर, प्रशांत मोरे, किशोर ढुमणे, विरेंद्र हजारे,डॅा.ओमप्रकाश बोबडे, डॅा. सुरेश महाकुलकर, रवि आसुटकर,रवि झाडे, संजीव पोडे, शरद धांडे, संतोष विधाते, विनोद सातपुते, महेश खंगार डॅा.भालचंद्र फलके, अनुप बोरडे, दिनेश कष्टी, वाहतूक निरीक्षक श्री. ठेगणे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये