Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

राजुरा तालुका महिला ब्राम्हण सभेने केले दीपदान व दीपप्रज्वलन – 1000 दिव्यांनी लखलखले संकटमोचन हनुमान मंदिर

पवित्र अधिक मासानिमित्याने केले धार्मिक आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुका ब्राम्हण सभेच्या महिला आघाडीने अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त संकटमोचन हनुमान मंदीरात दीप दान व दीप प्रज्वलन आयोजित केले होते. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सदर अनुष्ठानासाठी सर्व जाती व धर्माच्या महिलांनाही सामील करून महिलांनी सामाजिक एकता व बंधुत्वाचा संदेश पणतीच्या सोज्वळ प्रकशात सर्वत्र पसरविण्यात मोलाचे कार्य केले.

ब्राम्हण सभेच्या महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी संकट मोचन हनुमान मंदीरात जवळपास 1000 दिव्यांची आरास करण्यात आली. सायंकाळच्या आरतीच्या वेळी महिलांनी प्रज्वलित केलेले हे दीप प्रसन्नतेचा व सामाजिक एकोप्याचा प्रकाश सर्वत्र पसरवून शहराला बंधुत्वाचा संदेश देत असल्याची भावना मंदिरात आलेल्या भाविकांनी व्यक्त केली. सोबतच महिलांनी लावलेल्या दीपमालेच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले.

महिलांनी दीप दान उत्सव साजरा केल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना मसालेभात व गोडाचे प्रसाद म्हणून भक्तिभावाने वितरण केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्राम्हण सभेच्या अनुष्का रैच, सगुणा अवधूत, मीरा कुलकर्णी, श्वेता अपराजित, नम्रता खोंड, पुजा घरोटे ह्यांनी विशेष नियोजन केले होते. दीपदान उत्सवात राधा धनपावडे, कोमल शर्मा, मंगला चिंचाळकर, सुचिता भाकरे, माधुरी कुलकर्णी, अंजली जोशी, माणिक देशपांडे, प्रिया रानिंगा, प्रिती समर्थ, इशानी देशपांडे, सीमा देशकर, वैजयंती देशकर, राजश्री देशपांडे सुनिता चिंचाळकर, सुषमा सुब्बा, माही अवधूत, ज्योति रैच, नीता देशमुख, शशिरेखा देशमुख, सानिका टोपरे, वैशाली भाके, ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये