ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात दिनांक २८ सप्टेंबर २०२६ ते १४ ऑक्टोंबर २०२६ पासुन कुष्ठरुग्णशोध मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.

कोरपना :_ तालुक्यात कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम व कुष्ठरुग्ण शोध मोहीम

कुष्ठरोग आजारात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात जास्त कुष्ठरुग्ण निघणारा जिल्हा आहे. सदर आजाराचे निमुर्लन करण्यासाठी संशयीत रुग्ण शोधून त्यांना लवकरात लवकर उपचाराखाली आणणे. तसेच या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी व कुष्ठरुग्ण शोधुन काढण्यासाठी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ ते १४ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम कोरपना तालुक्यात राबविण्यात येत आहे.

यात तालुक्यातील गावामध्ये प्रभात फेरी,शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कुष्ठरोग आजारावरील म्हणी, कुष्ठरोग प्रदर्शनी आदी प्रकारे जनजागृतीपर कार्यक्रम तसेच कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे तालुक्यातील गावामध्ये आशाताई व स्वयंसेवक मार्फत सर्व लोकांची तपासणी होणार आहे त्यांना सर्व लोकांनी सहकार्य करावे व आपली व आपल्या परिवाराची तपासणी करून घ्यावी . सदर मोहीम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे सर कोरपना तालुक्याचे आरोग्य सहाय्यक श्री भाग्यवान कंडे, लेप्रा एनजीओ चे श्री गेडकर ,कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री सतीश पांढरे व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मधील कर्मचारी यांनी सदर मोहीम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी कोरपना तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.

*टिप*:- शरीरावर संवेदनरहीत लालसर फिकट रंगाचा चटटा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग संशयीत असू शकतो. अशा व्यक्तीने कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात नजिकच्या आरोग्य उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी. लवकर निदान लवकर उपचार केल्यास होणारी विकृती टाळता येवू शकतात. तसेच हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. अंगावर पाच पेक्षा कमी चट्टे असल्यास सहा महिन्यापर्यंत उपचार घ्यावे लागतात, तर पाच पेक्षा जास्त चट्टे असल्यास बारा महिन्यापर्यंत उपचार घेणे आवश्यक आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधश्रध्देला बळी पडल्यास शरीरीक अंपगत्व येवू शकते. सदर लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी व निदान करून घ्यावे. – डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी तालुका कोरपना .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये