ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

महिला बचतगटांचा मोठा प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार सावली तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सावली पंचायत समितीच्या सभागृहात “विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर” मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबीराच्या अध्यक्षस्थानी सावली न्यायालयाचे न्यायाधीश मा. ए.चव्हाण साहेब होते. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना कायद्याचे महत्त्व व मोफत विधी सेवा बाबत मार्गदर्शन आणि ग्रामीण भागातील सर्व वंचित घटकांना कायद्याविषयीची जाती निर्माण व्हावी यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे आव्हान केले.

याप्रसंगी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.बी.टी.लाडे, ॲड. पी,पी.शेंडे, ॲड.ए.एन.गेडाम, ॲड. जि.यु.ठिकरे, ॲड. कु.साची दुधे यांनी विविध कायद्यां विषयी मार्गदर्शन केले.

    यामध्ये हुंडाबळी,लिंग समानता,संविधानिक मुल्ये,महिलांचे अधिकार,आदीवासीं हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी योजना २०१५, बालकांसाठी बाल स्नेही कायदेविषयक धोरण२०२४ तसेच शासकीय विविध योजना विविध कायदेविषयक सेवा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबीराचे यशस्वितेसाठी बि.के मंगर,एस चांदेकर,व न्यायालयीन कर्मचारी,बार असोसिएशनचे अधिवक्ते,तालुका विधी सेवा समितीचे विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी स्वयंसेवक डॉ.कवठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विधी स्वयंसेवक दिलीप फुलबांधे यांनी मानले.

या शिबिराला तालुक्यातील महिला बचतगटाच्या प्रभात संघ महासंघाच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कायदेविषयक शिबिराचा लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये