ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्यावसायिक अभ्यास करणाऱ्या १० वी १२वी मुला, मुलीचा सत्कार

स्पर्धा करण्याची तयारी ठेवा. डॉ रमेश रमेशकुमार गजभे माजी राज्य मंत्री.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथे माना जमात मंडळ नागभीडचे वतीने १०वी,१२वी तील व्यावसायिक अभ्यास पूर्ण करणाऱ्या गुणवंताचा मुला -मुलीचा सत्कार ६ऑगस्ट रोजी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्य मंत्री डॉ रमेश गजभे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष अरविंद सादे कर, समाज सेवक संस्थापक नागपूर, प्रमुख अतिथी धारणे साहेब, उमाजी हिरे, प्रा श्रीरामे भंडारा, डॉ दिनकर चौधरी, कृष्णा नारणवरे, शंकरराव द ड म ल यांची उपस्थिती होती.

मा. ना. समाज मंडळ मुंबई शाखा नागभीड चे वतीने दरवर्षी प्रमाणे १०वी,१२वी व्यावसायिक अभ्यास पूर्ण करणाऱ्या गुणवंता चा सत्कार करून भविष्यातील येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्ण करताना येणाऱ्या अडचणीवर मात करीत आपलें स्थान निश्चित करताना जे कष्ट करावे लागते त्याची फल श्रुती झाल्याची गुण गौरव मंडळाचे वतीने पूर्ण केला जातो.१०वी,१२वी विद्यार्थी आपलें करिअर करताना एक उद्देश ठेऊन वाटचाल करीत असतात. पण हे करीत असताना त्यांना सामाजिक मदत, मार्गदर्शन यांची जोड असेल आणि जर त्याला प्रोत्साहन पर काही बाबी मिळाल्या तर त्याला आपलें उद्देश गाठताना मदत मिळाली तर सहज यशस्वी होण्यास सहकार्य मिळून त्या दिशेने प्रयत्न करण्यास चालना मिळते यासाठी विद्यार्थी हा कष्ट, जिद्द, आणि होताकरु यावर भर असणे गरजेचे आहे तरच फल श्रुती मिळते. मात्र अनेक वेळा काही कारणास्तव उपयश आल्यास ना उमेद होता पुन्हा जोमाने प्रयत्न करून यश प्राप्तीसाठीसदैव तप्तर असावे वेळ प्रसंगी ज्या व्यक्तीची मदत लागेल असे वाटले तर अशावेळी आपलें मंडळ सहकार्य करण्यास तप्तर असतें यासाठी विद्यार्थी आणि पालक यांनी जागरूक असणे गरजेचे आहे असे मत माझी राज्य मंत्री डॉ रमेशकुमार गजभे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक चळवळीचे नेते अरविंद सादेकर संस्थापक मनिका देवी मंडळ नागपूर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजावर होत असलेल्या अन्यविरुद्ध न्याय मिळवून देणाऱ्या मंडळाचे महत्वाचे कार्य शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी जे तरुण व्यावसायिक अभ्यास पूर्ण करून समाजाला कुटुंबाला आणि देशाला प्रगती पथावर नेणाऱ्या माझ्या १०वी,१२वी अभ्यास पूर्ण करून गौरवाची थाप देण्याकरिता मी जातीने उभा आहे याकरिता माझ्या बांधवासाठी मी रात्री, बेरात्री सदैव उभा राहून ऋण फेडत राहण्याचा माझा मानस आहे याकरिता आपल्या तरुण सहकार्यांची गरज आहे काळ स्पर्धेचा आणि संघर्षाचा आहे यातून आपण योग्य मार्ग निवडून आपलें यश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक न्यायाने पूर्ण करण्याचा विडा उचलून समाजाला न्यायाप्रति जागरूक असावे असे मत व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी मा. ना. जमात मंडळ मुंबईचे अध्यक्ष दामोधर धारणे साहेब, उमाजी हिरे प्रा श्रीरामे भंडारा, डॉ. दिनकर चौधरी, कृष्णाजी नारनवरे नागपूर, शंकराराव दडमल यांचीही मार्गदर्शन मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन निरंजन गजभे यांनी केले.

यावेळी नागभीड मंडळाचे अध्यक्ष मनोहर धारणे यांनी प्रास्ताविक करून आभार प्रदर्शन मधुकर दड मल यांनी केले. यावेळी व्यावसायिक अभ्यास पूर्ण करणाऱ्या १वी,१२वी गुण वंताचा सत्कार मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी समाज बांधव आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये