ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते जलतरण स्पर्धेचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे ब्ल्यू स्टार ॲकाडमीच्यावतीने आयोजित वर्धा स्वीम गाला या जलतरण स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी निमिश मुळे, ॲथलेटीक्स असोशिएशनचे सुधीर चौधरी आदी उपस्थित होते.

वर्धा शहरात जलतरण तलावाची चांगली सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील जलतरणपटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी या जलतरण तलावाचा उपयोग होत आहे. जलतरणामुळे जलतरणपटूंचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत आहे. नव्याने महिला व बालकांसाठी बांधण्यात येत असलेला जलतरण पुर्णत्वास येत असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. जलतरण तलावामुळे महिला व बालकांना मोठा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला जलतरणपटू, त्यांचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये