ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टरची बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींचा सावंगी मेघे पोलीसांनी शोध घेवून केली अटकेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे सिध्दार्थ शंकरराव मुन रा सिंदी मेघे वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दि. 01/09/2026 चे 18.00 वा ते दि. 02/09/2026 चे 06.00 वा दरम्यान. मौजा झाडगाव येथे घरासमोर उभी असलेली त्यांची टाटा कंपनीची 608 गाडीची गावातीलच विकास पंजाब अतकरे. यांचे ट्रॅक्टरची 1) एक एक्साईड कंपनीची बॅटरी जुनी वापरती किं. 6,000/ रू. 2) ट्रॅक्टरची नविन अॅमरॉन कंपनीची बॅटरी किं. 6,000/रू. असा एकुण जु.किं. 12,000/रू. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.ला अप.क. 708/2026 कलम 303 (2), 3(5) बी.एन. एस. प्रमाणे नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पो.नि. विनोद गिरी सा. ठाणेदार पो.स्टे. सावंगी यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना मार्गदर्शन करून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्दे‌माल व अज्ञात आरोपीचे शोधकामी रवाना केले असता मुखबीरकडून मिळालेल्या माहितीवरून 1) गौरव रमेश धुर्वे वय 24 वर्ष रा. झाडगाव, ता.जि वर्धा.2) प्रतिक पंडित कुरटकार रा. झाडगाव, ता.जि वर्धा. यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची दोन पंचासमक्ष कबूली दिली असून त्यांनी गुन्हयातील चोरी बॅट-या दाखवून दिल्याने त्यांचेकडून 1) एक एक्साईड कंपनीची बॅटरी जुनी वापरती किं. 6,000/रू. 2) ट्रॅक्टरची नविन अॅमरॉन कंपनीची कंपनीची बॅटरी बॅटरी किं. किं. 6,000/ रू. असा एकुण जु.किं. 12,000/रू. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. व आरोपीतांना गुन्हयात अटक करून वर्धा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली असून पुढील तपास संजय पंचभाई, हे करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये