भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधनाच्या पवित्र सण साजरा
रक्षाबंधनानिमित्त बहिणींना साडीची भेट ; हरिष ढवस व बंडू बुरांडे यांचे सामाजिक बांधिलकीचे दर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा : – रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाचे विशेष कार्यक्रम डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे,भाजपा तालुकाध्यक्ष हरिष ढवस, उपाध्यक्ष बंडू बुरांडे,भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष वैशाली बोलमवार, महामंत्री पपीता तोडसाम,छाया जनगणनवार,पपीता पोलपोलवार,नगरसेविका श्वेता वनकर,रोहिणी ढोले,माधुरी मोरे, माया कोहळे, माया बुरांडे, शिल्पा नागूलवार, हिना बिश्वास ,वैशाली वासलवार,शीतल लेनगुरे, पुष्पा कुळमेथे,चंद्रकला गव्हारे उपस्थित होते.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या पावन पर्वाचे औचित्य साधून अनेक बहिणींना साडी भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून हरिष ढवस व बंडू बुरांडे यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात येत आहे.



