दिड किलो गांजासह युवक ताब्यात
सुमठाणा येथे भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी शुक्रवारी रात्री चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील सुमठाणा जवळ मोठी कारवाई केली. रात्री ११.३० च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका युवकाकडून अंदाजे १.५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती पोलिसांना गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमठाणा परिसरात गस्त वाढवून नाकेबंदी केली. यावेळी एक युवक रात्री ११.३० च्या दरम्यान त्याच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकल क्र. एम एच ३४ ए जे ३४६४ ने चंद्रपूर कडून नागपूर कडे जणाऱ्या महामार्गाने सुमठाणा चौक येथे आला असता पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ४५४ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा आढळून आला. क्षितीज संजय जुनघरे (१९) रा. भंगाराम वार्ड, भद्रावती असे आरोपी युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचे व्हिडीओ व छायाचित्र घेण्यात आले. आरोपीवर कलम ८(क),२०(ब), एनडीपीएस कायदा अंतर्गत सहकलम ३(१)/१८१,१३०/१७७ मोवाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गांजाची बेकायदेशीर विक्री व वाहतूक रोखण्यासाठी भद्रावती पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला यश मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करण्यात येणार असून आरोपीकडून गांजाचा साठा कुठून आणला गेला, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास केला जात आहे.