ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
योग्य पाणी वापर करणे हे आपले कर्तव्य : अंबर कुडमते
पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळटीकरण उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- पाणी ही निसर्गाची देण आहे.प्रत्येक प्राणीमात्रांसाठी पाणी हे आवश्यक असून पाण्याचा योग्य साठा करुन ठेवणे आवश्यक आहे.योग्य पाणी वापर करणे हे आपले कर्तव्य आहे,असे विचार अबंर कुडमतेनी मांडले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळटीकरण उपक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर तर उपस्थितीत डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ धनराज खानोरकर,डॉ युवराज मेश्राम,अमित घोंगडे,सूरज मुळे, धनराज नन्नवरे व विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.संचालन डॉ युवराज मेश्राम तर आभार डॉ खानोरकरांनी मानले.



