ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या* भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध राज्यांतील आणि देशांतील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी विशेष ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वसुमना पंत यांनी आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती तातडीने नोंदवावी.

यामुळे अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत आणि समन्वय अधिक जलद गतीने पोहोचविणे शक्य होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी नागरिकांना या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध राज्यांतील आणि देशांतील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी विशेष ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वसुमना पंत यांनी आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती तातडीने नोंदवावी.

यामुळे अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत आणि समन्वय अधिक जलद गतीने पोहोचविणे शक्य होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी नागरिकांना या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये