ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते विधानसभा स्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी अमर बोडलावार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते विधानसभा स्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे रस्ते, पाणंद मार्ग तसेच ग्रामीण भागातील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

अमर बोडलावार यांची सह-अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या नियुक्तीमुळे शेतकरी व ग्रामीण भागाशी निगडित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतपाणंद रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी, पावसाळ्यात निर्माण होणारी दळणवळणाची समस्या तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा या विषयांकडे शासनस्तरावर लक्ष वेधण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अमर बोडलावार यांच्या नियुक्तीकडे स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

नव्याने मिळालेल्या जबाबदारीचा प्रभावीपणे उपयोग करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर राहणार असल्याचा विश्वास अमर बोडलावार यांनी व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये