पो.स्टे. अल्लीपुर अप.क्र. ३४१/२०२१ कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ भादंवि. मधील आरोपीस शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
श्री. गवई, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं. ३ यांनी अप.क्र. ३४१/२०२१ कलम २९४. ३२३, ५०४, ५०६ भादंवि मधील आरोपी मोरेश्वर गोविंदराव महाकाळकर, वय ५१ वर्षे, रा. कुली जि. वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम २९४ भादंवि. मध्ये १ महिन्याचा साधा कारावास शिक्षा व २०००/-रू. दंड
२. कलम ३२३ भादंवि. मध्ये ६ महिन्याचा साधा कारावास शिक्षा व १०००/-रू. दंड
घटनेचा थोडक्यात तपशील :-
यातील फिर्यादी नामे रामाजी लक्ष्मण वरभे, वय ८५ वर्षे, रा.एकुली जि. वर्धा यांचे मातीचे जुने घर असून न्याला लागून आरोपीचे घर आहे. पावसामुळे फिर्यादीचे घराची मागची भिंत पडल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी बाती गोळा करीत असतांना आरोपी हा सबलीने ढेकल फोडून माती घेवून जातांना दिसल्याने त्यास हटकले असता, आरोपीने अश्लिल शिवीगाळ करून ढोपराने फिर्यादीचे डावे डोळ्याजवळ मारले व फिर्यादीचे पत्नीस कलढुकल करून मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. अल्लीपूर अप.क्र. ३४१/२०२१ कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोहवा. दिनेश बागडी, ब.नं. ९६६ पो.स्टे. अल्लीपूर यांनी करुन मा. कोर्टात ोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रिया शेंडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व रवी अंमलदार सफौ. रामदास चकोले, ब.नं. २५५ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून बोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे. अल्लीपूर ठाणेदार स.पो.नि. संगीता हेलोंडे यांनी सदर गुन्ह्यातील नाक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदर्शन केले आहे. मा. श्री. वई, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं. ३ यांनी गुन्ह्यातील आरोपीस १) कलम २९४ नादंवि. मध्ये १ महिन्याचा साधा कारावास शिक्षा व २०००/-रू. दंड २) कलम ३२३ भादंवि. मध्ये ६ महिन्याचा नाधा कारावास शिक्षा व १०००/-रू. दंड शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक
स्था.गु.शाखा वर्धा



