ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आमदार असावा तर असा! मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
ईद हा केवळ धार्मिक सण नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सर्वधर्मीयांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण करणे, हीच खरी लोकप्रतिनिधीची ओळख आहे.
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर राखत आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. “आमदार असावा तर असा—जो प्रत्येक समाजाला आपलंसं मानतो!” अशी भावना यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
ईदच्या या पवित्र पर्वातून समाजात प्रेम, शांतता, एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.



