ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा _ अल्प मानधनात बजावतात सेवा

शासन परिपत्रक असताना अधिकाऱ्यांकडून कामाची सक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अगदी बालवयात जीवनाचे बाळकडू मिळते ते अंगणवाडी केंद्रात याच केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस केंद्र तसेच राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अल्प मानधनात सेवा बजावत असताना आपल्या दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त याच अंगणवाडी ताई आणि सेविका यांना शासन स्तरावर विविध विभाग यामध्ये आरोग्य, शिक्षण, पंचायत विभाग, निवडणूक आणि इतर सर्वेचे कामे मानधनावर काम करणाऱ्या ताईकडे सोपविल्या जाते जर त्यांनी नकार दिला तर त्यांना स्थानिक पातळीवरून अधिकारी बिन पगारी सेवामुक्त करण्याच्या धमकी वजा इशारा अधिकारी देतात. निमुटपणे सदर कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त सोपविले कामे सुद्धा वेळेत पूर्ण करून देतात. यावर अंगणवाडी संघटनांनी उठाव केल्यानंतर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामे न सोपविण्याचा अध्यादेश काढला जरी असला तरीसुद्धा स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्याच्या दबावामुळे शासकीय काम करण्यास भाग पाडतात.. त्यामुळे शासनाच्या अध्यादेश या ठिकाणी लागू होत नाही का असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

:एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि मिनी अंगणवाडी केंद्रात मिनी अंगणवाडी सेविका हे मानधनी कर्मचारी कार्यरत असतात. अंगणवाडी / मिनी अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पुरकपोषण आहार, पूर्वशालेय शिक्षण या सेवा दररोज तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य संदर्भ सेवा आणि पोषण व आरोग्य विषय शिक्षण या आरोग्य विषयक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने दिल्या जातात. अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी व त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा पहाता, त्या नियमितपणे लाभार्थ्यांना पुरविणे, देशाची भावी पिढी निरोगी व सुदृढ राहावी, या दृष्टीकोनातून आवश्यक आहे. त्यामुळे वर नमूद अंगणवाडी कर्मवाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त जिल्हास्तरावरुन गुड मॉर्निंग, शेततळे बांधकाम, अन्न शिजवून देणे यासारखी कामे सोपविण्यात येतात. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त कोणतीही कामे परस्पर देण्यात येऊ नयेत, असे आदेश याद्वारे देण्यात येत आहेत. या कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त कोणतेही काम द्यावयाचे असल्यास अशा प्रसंगी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी.

शासनाची मान्यता प्राप्त करुन घेतल्याशिवाय कोणतेही योजनाबाहय काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यापुढे देण्यात येऊ नयेत. असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून निर्गमित यापूर्वीच झालेले आहे. *अतिरिक्त कामे करून घेता मग वेतनश्रेणी का नाही*..? अंगणवाडी केंद्रामध्ये शालेय गृहपाठव्यतिरिक्त, बालकांची आरोग्याची काळजी घेणे, बाल वयात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, पुरवठा झालेला पोषण आहार बालकांना देणे, केलेल्या प्रत्येक कामाचा दैनंदिन अहवाल तयार करून मासिक मीटिंगमध्ये सादर करणे यासह महिला व बालकल्याण विभागाचे दैनंदिन काम करून जी कामे स्थानिक पातळीवर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, निवडणूक विभागाचे विविध कामे वेतनश्रेणी धारक कर्मचारी नकार देतात तीच कामे अंगणवाडी सेविकांच्या माथी मारल्या जाते. स्थानिक पातळीवर अधिकारी दबाव टाकून करून घेत असल्यामुळे अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू होत नसल्याने अल्प मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामे कशी दिल्या जातात याचे उत्तर मात्र अधिकाऱ्याकडे केव्हाही नसते..

 अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी या शासनाच्या अल्प मानधनावर काम करून अंगणवाडी केंद्रातील बालकांना नित्यनियमाने, शैक्षणिक, आरोग्य, पोषण आहार आणि इतर सेवा देतात, स्थानिक पातळीवर शासनाची कामे इतर विभागाने नकार दिल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कसलीही सूचना न देता त्यांना सक्तीचे स्थानिक अधिकारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने जी कामे दिलेली आहे त्या व्यतिरिक्त कामे देण्यात येऊ नये. असे कॉ.शशिकला मौर्य – जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक. यांनी सांगितले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये