देऊळगाव राजा हायस्कूल येथे हजारो विद्यार्थ्यांनी घेतली नशा मुक्तीची प्रतिज्ञा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय राजस्थान माउंट आबू यांच्या वतीने राजयोग एज्युकेशन व रिसर्च फाउंडेशन चिकित्सा विभागाद्वारे संपूर्ण भारतभर दहा कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियान सुरू आहे. संपूर्ण देशभर ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयांच्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेच्या वतीने स्थानिक ठिकाणी दहा कोटी नशा मुक्ती अभियानाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने देऊळगावराजा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने अनेक शाळा कॉलेजमध्ये जाऊन नशा मुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा शाखेच्या संचालिका बी.के. सुनंदा दीदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा येथे 25 ऑगस्ट रोजी बी.के. देवकला दीदी यांनी विद्यालयाचा परिचय देऊन व्यसनाचे असलेले अनेक प्रकार व त्यांचे समाज जीवनावर आणि वैयक्तिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले. सोबतच व्यसनमुक्तीची शपथ देखील दिली.
आजचा विद्यार्थी उद्याचा भारतीय नागरिक होणार आहे जेणेकरून भारतातील भविष्यातील नागरिक सुदृढ व्हावेत . नशा एकाच प्रकारची नसून, सिगारेट, तंबाखु , दारू ,इत्यादी व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ह्या उपक्रमामध्ये देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य श्री कोल्हे तसेच संपूर्ण शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. ब्रह्मकुमारी विद्यालयातील सुभाष ढाकणे , प्रल्हाद ढोरे, चंद्रकांत टेंभुरकर,मंगला वखरे, पुष्पा मोरे, या साधकांनी सहकार्य केले
यावेळी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते



