महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात HIV/एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण रुग्णालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेश उलमाले ग्रामीण रुग्णालय गडचांदूर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रदिप परसुटकर, सचिन भैसारे, सुधीर थिपे, प्रताप शेंडे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचालन सुधीर थिपे तर आभार प्रदर्शन प्रदिप परसुटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते होते.



