ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीच्या मुली-महिलांचा लावणीच्या जागतिक विक्रमात सहभाग

माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारी एक ऐतिहासिक घटना भद्रावतीत घडली आहे. लावणीच्या जागतिक विक्रमात जिल्ह्यातील तब्बल २४३२ महिला व युवतींनी एकत्रित सहभाग नोंदविला . यात भद्रावती शहरातील महिला व युवतींनी आपल्या कलेचे विशेष दर्शन घडवले. या विक्रमामुळे भद्रावतीचे नाव पुन्हा एकदा देश-विदेशात पोहोचले आहे.

चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात जिल्हाभरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकसंघ हालचाली, शिस्तबद्ध सादरीकरण आणि पारंपरिक लावणीच्या ठेक्यावर महिलांनी केलेल्या नृत्यामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भद्रावती येथील वृंदावन सभागृहात सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कलागुणांना नवी ओळख मिळाली.

लोककलेचा वारसा जपण्यासाठी आणि महिला-मुलींना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लावणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या ऐतिहासिक उपक्रमातून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच भद्रावतीच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर नवी झळाळी मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये