ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव पोलिस स्टेशन येथे 80वा स्वातंत्र्य दिवस केला साजरा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांनी केले झेंडा वंदन…

सदाशिव ढाकणे पोलीस निरीक्षक पुलगाव यांनी दिली झेंड्याला सलामी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुलगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी पुलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मॉक ड्रील घेण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेलेंच्या उपस्थितीत तसेच पोलीस निरीक्षक सदाशिव ठाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉक ड्रील घेण्यात आली. यावेळी पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याच्या संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा सराव करण्यात आला.

या सरावात पुलगाव पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी व 39 अंमलदार, देवळी पोलीस ठाण्यातील ४ अंमलदार, खरांगणा पोलीस ठाण्यातील ३ अंमलदार तसेच अल्लीपूर पोलीस ठाण्यातील ४ अंमलदार असे एकूण ४ अधिकारी व ३९ अंमलदार सहभागी झाले.

आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे या मॉक ड्रीलमधून स्पष्ट झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये