ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवाग्राम पोलीस ठाण्यात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहातकेला साजरा

देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक सेवाग्राम यांनी केले झेंडा वंदन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेवाग्राम : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष पूर्ण झालेले आहे या निम्मिताने पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला या वेळेस पोलीस स्टेशन चे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पोलीस ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन केले.

कार्यक्रमानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सेवाग्राम पोलीस ठाण्याचे PSI देवेंद्र ठाकूर, PSI शशिकांत जगताप, PSI बांबर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अखिलेश गव्हाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश दरवरे याच्यासह पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष पोलीस अधिकारी तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस ठाण्याचा परिसर तिरंगी ध्वज व आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. देशभक्तीच्या वातावरणात हा राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये