श्री समर्थ कृषी महाविद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न श्री समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे समर्थ शैक्षणिक संकुलात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांनी ध्वजारोहण केले व उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारताचे स्वातंत्र्य कशाप्रकारे प्राप्त झाले व याचा उपयोग तरुणांनी योग्य प्रकारे करून देश सक्षम करण्यासाठी एकजुटीने, एकतेने राष्ट्र विकास आपल्या शिक्षणातून करावा असे सांगत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा मोहजितसिंग राजपूत यांनी केले. याप्रसंगी श्री समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, उपप्राचार्य देवानंद नागरे, समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रफुल्ल ताठे, समर्थ स्कूल ऑफ नर्सिंग चे प्राचार्य डॉ योगेश ताठे, समर्थ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन घुगे, प्रा गबाजी कुटे, भानुदास कोल्हे, वसंतराव नागरे महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ कृषी महाविद्यालय व समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.



