ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरीपुत्र रूपेश ताठेची इंग्लंडच्या मिनी काऊंटी क्रिकेटसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा: तालुक्यातील टाकरखेडा भागिले या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रूपेश रघुनाथ ताठे याची इंग्लंडमधील मिनी काऊंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील या महत्त्वाच्या टप्प्यासाठी रुपेशची विमानाने इंग्लंडकडे रवानगी झाली आहे. रूपेशचे वडील रघुनाथ नामदेव ताठे हे शेतकरी आहेत. ग्रामीण परिस्थितीतून आलेल्या रूपेशने लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जोपासली. प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने क्रिकेटमध्ये

आपले स्थान निर्माण केले. स्थानिक पातळीपासून सुरू झालेला त्याचा क्रिकेटचा प्रवास आता थेट इंग्लंडच्या मैदानापर्यंत पोहोचला आहे. इंग्लंडच्या मिनी काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी ही रूपेशच्या आजवरच्या

मेहनतीला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परदेशातील क्रिकेट स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारल्याने त्याच्या यशाची चर्चा परिसरात होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये