ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा ४० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

राज्याला अखंडीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध

चांदा ब्लास्ट

२९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेले महानिर्मितीचे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करीत असून राज्याला अखंडीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व दि. १६ जानेवारी २०२४ रोजी मुख्य कार्यक्रम म्हणजेच मान्यवरांचे मार्गदर्शन, बक्षिस वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मीतीचे संचालक (संचलन) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक (सं. व सु.-२) पंकज सपाटे, कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे उपस्थित झाले. चंमऔवि केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, उपमुख्य अभियंते सर्वश्री श्याम राठोड, डॉ.भूषण शिंदे, प्रफुल्ल कुटेमाटे, अनिल पुनसे, फनिंद्र नाखले, मिलिंद रामटेके, महाव्यवस्थापक वित्त व लेखा बाहुबली डोडल, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, वेकोली चे सहाय्यक महाव्यवस्थापक हर्षद दातार, वर्धापन दिन समितीचे सचिव रवींद्र चौधरी, संयुक्त सचिव राजेश आत्राम हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे सूमधूर अश्या स्वागत गीताने तसेच ग्रामगीता व स्मृतीचिन्ह देऊन झाले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपमुख्य अभियंता डॉ. भूषण शिंदे यांनी केले तर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे अहवाल वाचन रवींद्र चौधरी यांनी केले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचार्यांदचे अभिनंदन केले. त्यानंतर सांघिक कार्यालयातील अधिकारी, इतर विद्युत केंद्रांचे मुख्य अभियंता तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांचे कडून प्राप्त शुभेच्छा संदेशांचे वाचन अतिरीक्त कार्यकारी अभियंता सविता फुलझेले यांनी केले. मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे कौतुक केले व आपली कामगिरी अशीच सुधारत राहील अशी ग्वाही दिली. कार्यकारी संचालक (सं. व सु.-२) पंकज सपाटे यांनी सर्वांचा सहभाग असला तर कुठल्याही अडचणींवर मात करुन आपण आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहू असे मनोगत व्यक्त केले. महानिर्मीतीचे संचालक (संचलन) संजय मारुडकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच वर्धापन दिनाच्या विविध कार्यक्रमांमुळे जो उत्साह व ऊर्जा आहे तोच आपल्या दैनंदीन कामांमध्ये ठेऊन आपण संच नेहमी पुर्ण कार्यक्षमतेने चालवावे व आपली बॅलंस शीट नेहमी नफ्यात राहावी अशी आशा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन सहाय्यक कल्याण अधिकारी राणू कोपटे व सहाय्यक अभियंता तेजस्विता राऊत यांनी केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर वसाहत हाऊसकिपींग स्पर्धेचे निकाल वाचन कल्याण अधिकारी दिलीप वंजारी व वर्धापन दिन समितीचे संयुक्त सचिव राजेश आत्राम यांनी केले तसेच क्रिकेट, फूटबॉल, व्हालीबॉल, बास्केटबॉल व कबड्डी इत्यादी सांघिक खेळांचे मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यानिकेतन व विद्यामंदिर शाळा, ऊर्जानगर येथील मुलांचे नृत्य सादर करण्यात आले. नृत्यासोबतच नवीन व जुने सदाबहार गाण्यांना ऊर्जानगर रहिवाश्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नृत्य व गायनाच्या कार्यक्रमाने सर्व मान्यवर तसेच उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्र संचलन नासीर खान यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये