शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कार्यकर्ता मेळाव्याने भरला उत्साह व जोश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुका काँग्रेस व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बालाजी सेलिब्रेशन हॉल, गडचांदूर येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसच्या झेंड्याखाली जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले. या मेळाव्यात खासदार प्रतिभाताई धानोरकर व जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार नेते सुरज ठाकरे यांचे समर्थक नारंडाचे आशिष कुचनकर, गडचांदूरचे मिलींद सोनटक्के, जिवतीचे गणेश सुरनर, सोनुर्लीचे शंकर वाढई, आशिष बावणे या प्रमुखांसह जवळपास २०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेस विचारसरणीवरील आपला विश्वास दृढ केला.
यावेळी कार्यकर्ता बैठकीदरम्यान नेत्यांच्या मार्गदर्शनातून भाजपच्या कारस्थानांवर गंभीर भाष्य करण्यात आले. खा. राहुल गांधींनी उघड केलेल्या “भाजपच्या मतचोरी” व “बिहारमधील जवळपास ३५ लाख मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार” यावर चर्चा झाली. याप्रसंगी स्थानिक कार्यकर्त्यांना मतदार यादीतील गैरप्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवून एकजुटीने व जोमाने लढण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये खा. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी नगराध्यक्षा सविता टेकाम, गडचांदूर शहराध्यक्ष संतोष महाडोळे, नोगराज मंगरूळकर, विठ्ठलराव थिपे, संभाजी कोवे, रऊफ खान, कृषी उ. बा. समिती सभापती अशोकराव बावणे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देरकर, सचिन भोयर, शैलेश लोखंडे, विक्रम येरणे, प्रा. हेमचंद दुधगवली, एकनाथ गोखरे, महादेव हेपट, जयश्री ताकसांडे, अहमद भाई, बंडू चौधरी, नानाजी आदे, अभय मुनोत, सुनील झाडे, उमेश राजूरकर, किरण ऐकरे, मुर्लीधर बल्की, दिपक खेकारे, भाऊजी चव्हाण, आशिष वांढरे, हारून सिद्धिकी, प्रितम सातपुते यांचा समावेश होता. कोरपना तालुका काँग्रेस, गडचांदूर शहर काँग्रेस व तालुक्यातील सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मेळावा ऐतिहासिक व ऊर्जावान ठरविला.