ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळानी सहकार्य करावे 

उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आगामी गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा, तसेच ईद ए मिलाद उत्सव शांततेत साजरे करावे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळानी पोलिस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी केले.

शांतता समितीची बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली, अध्यक्ष स्थानी मनिषा कदम होत्या.

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कंपनी च्या भोंगळ कारभाराबद्दल आवाज उठवून, वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याने तीव्र नाराजी वर्तवली. मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त कराव्या मिरवणूक मार्गावरील अतिक्रम काढावे, व इतर समस्या मांडल्या, मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी अतिक्रमण काढून टाकण्यात येईल असे सांगितले, मिरवणुकीत डी जे चा वापर करताना आवाजाची मर्यादा ठेवावी, आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येईल असे मनिषा कदम यांनी स्पष्ट केले, सभेला माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर,पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी, यांनी सुद्धा मागदर्शन केले.

सभेला विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समिती चे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये