ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

एप्रिल २०२३ करीता वर्धा पोलीसांना मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचा सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १०-१२-२०२२ रोजी मांजा सत्याग्रही घाट, तळेगाव श्यामजीपंत, वर्षा या ठिकाणी साधारणतः ३० ते ३५ वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या व कुजलेल्या स्थितीत मिळून आला होता. त्यावरून फिर्यादी नामे भिमराव रमेशराव शिंगरे वय ४६ वर्ष रा वार्ड क्र ४ आठवडी बाजार, तळेगाव शा पंत यांनी दिलेल्या तोड़ी रिपोर्टवरून पोस्टे तळेगाव शा पंत. येथे अप क्र ६६३/ २०२२ कलम ३०२, २०१ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा येथील ३, पोलीस स्टेशन तळेगाव येथील २ व आर्वी येथील १ अशी एकूण ६ पथके तयार करुन गुन्हयाचा सखोल तपास सुरु करण्यात आला होता. पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पथकासह तळेगाव येथे मुक्काम करुन सदर गुन्हयाचा अहोरात्र तपास केला होता.

घटनास्थळावर मिळून आलेले मयत महिलेचे दागिने, कपडयांचे तुकडे व चप्पल यावरून वर्धा, नागपुर शहर, नागपुर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा तसेच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा, पांढरकवडा, मुलताई, आठनेर व बेतुल येथील अंदाजे २५०० ते ३००० मिसिंग महिलांबाबत पोलीस स्टेशन तसेच सीटीजन पोर्टलवर पाहणी करून शोध घेण्यात आला होता. मृतदेहावर मिळालेल्या वस्तुंच्या आधारे अनेक बेनटेक्स दागिने विक्रते, कापड विक्रेते, टेलर व चप्पल विक्रेते यांच्याकडे शहानिशा करण्यात आली होती. घटनास्थळ परीसरातील गुरेढोरे चारणारे, जंगलातील लाकुडतोड करणारे इसम वनविभागाचे कर्मचारी, हायवेवरील पेट्रोलपंप, हॉटेल्स, पंक्चर दुरुस्ती करणारे इसम यांचेकडे सखोल चौकशी करण्यात आली होती. घटनास्थळाजवळुन जाणाऱ्या हायवेवरील २५ ते ३० ठिकाणांचे सी.सी.टी.व्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले होते. घटनास्थळी मिळून आलेल्या कपड़े व इतर वस्तु यावरुन विशिष्ट समाजाच्या अनेक ठिकाणच्या तांडे व बेडयांवर मतदार यादीच्या मदतीने १२०० ते १५०० महिलांची तपासणी करण्यात आली होती.

आशावरील यादीवरुन साधारण २००० महिलांची चौकशी करून शोध घेण्यात आला होता. सायबर सेलच्या मदतीने सखोल तांत्रीक तपास करण्यात आला होता. सदरचा गुन्हा अनतीक संबंधातून झाला असावा यावरुन त्याअनुषंगाने अनेक महिलांकडे सविस्तर चौकशी करण्यात आलेली होतो. विदर्भातील उसतोड कामगार, संत्रातोड कामगार, कंपन्या, रस्ते व बांधकामावर काम करणान्या महिला मजुरांबाबत अनेक ठिकाणी चौकशी

करण्यात आली होती. दरम्यान दोन विवाहीत महिलांचा मिसींग तक्रारीवरून मध्यप्रदेश व हैद्राबाद येथे शोध घेण्यात

आला होता. परंतु उपयुक्त माहिती मिळुन आली नव्हती.

सदर एकंदर तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरुल हसन साहेब हे दररोज रात्री हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे तपासाची माहिती घेवून पुढील तपासाबाबत उपयुक्त सुचना देत होते.

सदर गुन्हयाचा अशारीतीने सविस्तर व सखोल तपास करीत असताना नेर, जिल्हा यवतमाळ येथील गुप्त बातमीदाराकडुन अशी खात्रीशीर माहिती मिळाली की, मंगरुळ चव्हाळा, ता. नांदगाव (खंडेश्वर), जिल्हा अमरावती येथील एक महिला मागील बऱ्याच दिवसांपासून वडाळी अमरावती शहर येथे लग्नाकरीता गेल्यानंतर आजपावेतो मिसिंग आहे व तिचा काहीतरी घातपात झालेला असावा. सदर माहितीवरून शोध घेत असताना पो.स्टे. फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दिनांक ०५/१२/२०२२ रोजी दाखल असलेल्या मिसिंग क्रमांक १०४/२०२२ मधील हरविलेली महिला नामे ज्योत्सना मनिष भोसले वय ३२ वर्ष हिच्या मुंबई येथे राहात असलेल्या आई नामे श्रीमती नशेरा चरपूरा पवार व भावजय श्रीमती यशोदा जोशिंग पवार यांना तळेगाव पोलीस स्टेशन येथे बोलावून घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तु दाखविल्या असता त्यांनी सदरच्या वस्तु ज्योत्सना हिच्याच असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले. त्यानंतर सदरबाबत सखोल तपास करीत असताना ज्योत्सना हिचा नवरा मनिष इंग्लीश भोसले व त्याचा मावसभाव प्रविण परमीट पवार यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा नेर (परसोपंत), जि. यवतमाळ येथील वेगवेगळया फासेपारधी राहत असलेल्या बेडयांवर शोध घेत असताना ते दोघे मिळून आले नाहीत. त्यांनतर गुप्त चातमिदारांच्या मदतीने त्यांचा सातेफळ, ता. नेर येथील जंगलात कसून शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन तळेगाव येथे आणून त्यांचेकडे घटनेबाबत सखोल, कसुन व सविस्तर चौकशी केली असता त्यांना सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात रितसर अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याचेवर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न. गंभीर दुखापत व दारुबंदी अशाप्रकारचे एकुण १० गंभीर गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्हयाच्या केलेल्या उत्कृष्ठ तपासाबाबत गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे माहिती पाठविण्यात आली होती. एप्रिल २०२३ करीता संपुर्ण महाराष्ट्रातील विविध पोलीस आयुक्तालय व जिल्हयातून सर्वोत्कष्ट तपासाकरीता माहिती मागविण्यात आली होती. सदर बाबत मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नामनिर्देशन झालेल्या गुन्हयांबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पुन्हा एकदा माहिती • घेतली होती. पो. नि. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वधा यांनी सदर तपास व गोळा केलेल्या पुराव्यांबाबत माहिती त्यांना सादर केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून वर्धा पोलीसांना एप्रिल २०२३ करीता मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे रुपये १०,०००/- व प्रमाणपत्र असे बक्षिस जाहिर झाले आहे.

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, ना.प. नागपूर श्री छेरिंग दोरजे व मा. पोलीस अधीक्षक वर्षा श्री नूरुल हसन यांनी तपास पथकाला सातत्याने केलेल्या मार्गदर्शन व सुचनांचा सदर गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचा वाटा होता. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तळेगाव पोलीस स्टेशनच्या संपूर्ण तपास पथकाचे विशेष कौतूक केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये