ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलीसांकडून आरोपीवर जुगार रेड

एकूण ४८ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दि. 02/08/2023 रोजी मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून डि.बी. पथकाचे पो.हवा./261 येनुरकर, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.ना./299 राजेंश शेंडे, पो.शि./1626 वैभव चरडे यांनी दोन पंचासह यातील नमुद आरोपीवर त्याचे राहते घरी रेड केला असता, आरोपी शेख सत्तार शेख रझ्झाक वय 62 वर्ष, रा. गांधी वार्ड क्र 02 नंदोरी तह. समुद्रपूर जि. वर्धा हा मोक्कावर रंगेहाथ कल्याण ओपन  वरली वर मोबाईल फोनद्वारे सट्टा पट्टीचे आकडे घेतांना मिळून आल्याने, त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवून, कायदेशीर रित्या त्यांची अंगझडती घेतली असता, झडती दरम्यान वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 48,860 रू चा मुद्देमाल मिळून आला असून, त्याचे जवळून मिळालेली रक्कम हि जुगाराची असल्याचे व लोकांकडून सट्टापट्टीचे आकडे घेण्याकरीता मोबाईलचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदरचा माल जप्त केला. जप्त मुद्देमाल व आरोपी शेख सत्तार शेख रझ्झाक वय 62 वर्ष, रा. गांधी वार्ड क्र 02 नंदोरी तह. समुद्रपूर जि. वर्धा यास ताब्यात घेवून पो.स्टे. परतीनंतर आरोपीविरूध्द नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

         सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये