महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आज घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी भूषविले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबुजा हॉस्पिटलचे ब्रदर्स प्रमोद मोहुर्ले, व प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे , रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदिप परसुटकर, प्रा आशिष देरकर , प्रा सचिन भैसारे, प्रा सुधीर थिपे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा आशिष देरकर यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रदिप परसुटकर यांनी केले या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



