ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :- तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आज विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजाचे अध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, कार्याध्यक्ष मधुकरराव धुळे,प्रा.अशोक डोईफोडे होते, सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी, गोविंदराव बोरकर, प्रकाश अहिरे,अरुण सपाटे, अरुण खरात,प्रा.विजय रायमल , शांतीलाल निरफळे , रमेश गवई तथा इतर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव बोरकर यांनी केले, शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये