देऊळगाव राजा येथे हातमाग दिन उत्साहात साजरा..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री सुखानंद स्वामी मठामध्ये “राष्ट्रीय हातमाग विणकर दिन”7 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम श्री सुखानंद स्वामीजींच्या पावन समाधीस तसेच भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. याप्रसंगी श्री घनश्याम भंडारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री शांतीलाल निरफळे, श्री रंगनाथ सपाटे, श्री गोविंदराव अहिरे, श्री ह.भ.प. अनिल महाराज सपाटे इ.उपस्थित मान्यवरांनी हातमाग दिनाच्या निमित्ताने हातमाग व्यवसाया विषयी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यावेळी समाजात आणि गावात हातमाग विणकरांना कसा मानसन्मान होता या व अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या वपुढील वर्षी सर्व साळी, कोष्टी या विणकर समाजाने हातमाग दिनाचा सोहळा अतिशय एकजुटीने मोठ्या प्रमाणावर व उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करुन विणकाराच्या कष्ट, कौशल्य, हस्तकला व कारागिरी इत्यादी गुणांचा गौरव करत आजही राष्ट्रीय औद्योगिक विकासात तसेच पैठणी विणकामात विशेषकरुन येवला येथे हातमाग विणकारांचे मोठे योगदान असल्याचे उद्गार काढले. कार्यक्रमास श्री पांडुरंग नाना मैंद्रे, राधाकिसन अहिरे, गोविंदराव अहिरे, दत्तात्रय कोरडे, नंदकिशोर कोरडे, विनोद मैंद्रे, प्रकाश लाहोरे, कैलास भागवत, मधुकर धुळे, आण्णा भाऊ सपाटे, रंगनाथ सपाटे, अरुण सपाटे, घनश्याम भंडारे, गणेश रोडे, अनिल सपाटे, शरद निश्चल, वसंत लिपारे, जगदिश बरगे, सुशिल हनुमंते, दामुआण्णा पावले तथा विणकर समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन श्री धर्मराजजी हनुमंते अध्यक्ष- एस.बी.सी.संघर्ष समिती जिल्हा बुलडाणा यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी तर आभारप्रदर्शन शरद निश्चल यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी हातमाग विणकर ज्येष्ठ समाज बांधवांचा श्री धर्मराजजी हनुमंते यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला.



