Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट

सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे  देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच अतिशय सामान्य कुटुंबातील व्यक्ती पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता ते वन विकास महामंडळ अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री व सलग दोनदा राज्याचे विरोधी पक्ष नेते असा यशस्वी प्रवास गाठणाऱ्या नवनियुक्त विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे पक्ष सहकारी व सत्ताधाऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव करीत अभिनंदन करण्यात आले. तर राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे  प्रतिपादन करून नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सर्वांचे आभार मानले.
विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सभागृहात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सलग दोनदा सरपंच असलेले माझे वडील यांच्या निधनाने कुटुंबावर बेताची परिस्थिती ओढवली. अशा हलाखीच्या परिस्थितीत राज्यातील अतिदुर्गम ,आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त  जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली येथे कुटुंबाचे स्थलांतर झाले. यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता काही काळ तेंदू पत्ता संकलनाचे काम देखील करावे लागले. शिवसेना पक्षात प्रवेशानंतर गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात 550 शाखा उघडून युवकांना रोजगारासाठी प्रेरित करीत असताना चक्क नक्षल्यांचाही सामना करावा लागला. यादरम्यान नक्षलवाद्यांशी झालेली भेट या अविस्मरणीय प्रसंगाचा विशेष करून त्यांनी यावेळी उल्लेख केला. विरोधी पक्षनेता म्हणून दुसऱ्यांदा मिळालेली ही संधी गोरगरीब जनसामान्य यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी असून राज्यातील कष्टकरी, शेतकरी,दिन दुबळे,ओबीसी,दलित,आदिवासी, व सर्वसामान्य नागरिकांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचविण्यासाठी मिळालेली संधी होय असेही ते यावेळी म्हणाले. तर राष्ट्रपितांवर झालेल्या टीका टिप्पणीचा समाचार घेत विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान याचे महत्त्व पटवून देणारी उदाहरण देत गांधीजींच्या महानते बाबत व देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देउन जीवनावर प्रकाश टाकला. तद्वतच विदर्भाचे नामवंत कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळी, व शेरेबाजी करीत प्रखर शैलीची चुणूक दाखविली. सोबतच सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ 200 हून अधिक असताना विरोधी भूमिका वठविण्यासाठी केवळ सामर्थ्य आणि प्रामाणिकता हवी असल्याचे सूतोवाच करीत सरकारने विपक्षांना देशाच्या संविधानात्मक अधिकारातून विश्वासात घेऊन राज्य विकाससाठी प्रयत्नशील राहावे. अशी मागणी वजा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
वडेट्टीवार हे नेतृत्वच वेगळे – अजित पवार
आपला होमपीज असलेला मतदार संघ सोडून इतरत्र निवडणूक लढण्यास कुणीही तयार होत नाही. मात्र नवनीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांनी सलग दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. त्यांच्या दांडगा जनसंपर्क व लोकोपयोगी कामांसाठी धडपड आत्या यशाचा मूलमंत्र असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये