ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात शालेय मंत्रीमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार

सावली :- भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे सत्र २०२६ – २०२७ साठी नुकतीच शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.त्यात शालेय मुख्यमंत्री म्हणून साहिल अतुल मांदाडे,उपमुख्यमंत्री राधिका मनोज चौधरी,क्रीडामंत्री अदित मंगलदास म्हस्के,आरोग्य व स्वच्छता मंत्री कुमारी अपर्णा आनंदराव भोयर, सांस्कृतिक मंत्री कुमारी जागृती सुनील मराठे,सहल मंत्री पृथ्वी यादव सहारे तर शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी रिया रेकचंद फाले यांची निवड करण्यात आली. शालेय मंत्रीमंडळ निवडणूक विद्यालयाचे शिक्षक प्रकाश गेडाम आणि महेश देहारकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.मंत्रिमंडळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार तसेच सर्व संचालक मंडळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये