ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप महानगर कार्यालयात राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा.

चांदा ब्लास्ट

 भाजप महानगर कार्यालय येथे राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यिक परंपरा आणि दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेची भूमिका याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

          कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जनता महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्राध्यापिका मंजुळा निमकर उपस्थित होत्या. त्यांनी हिंदी भाषेचा इतिहास, तिचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच राष्ट्राच्या एकात्मतेमध्ये हिंदी भाषेची भूमिका याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

           हिंदी ही देशातील विविध भागांना जोडणारी महत्त्वाची भाषा असून, तिच्या संवर्धनासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी भाषेच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण अधिक व्यापक पद्धतीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

          यावेळी महामंत्री रवि गुरनुले, सविता दंढारे, भाजप नेते अड. सुरेश तालेवार, अनु. जाती अध्यक्ष विमल काटकर, अल्प संख्याक अध्यक्ष कौसर खान, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार आक्कापेल्लीवार, विध्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री, शिक्षिका वैशाली मद्दीवार, उजमा शेख, यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हिंदीप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून हिंदी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये