सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मोर्चातर्फे अभिषेक व पूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : आमदार डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, पोंभुर्णा यांच्या वतीने राजराजेश्वर मंदिरात अभिषेक, पूजा-अर्चना करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर जनसेवेसाठी प्रार्थना करण्यात आली.
गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदाही विधिवत मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. समाजातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता महिला आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना अखंडपणे कार्य करण्याची शक्ती लाभो तसेच त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अल्का आत्राम, सुलभा पिपरे, वैशाली बोलमवार, ज्योती बुरांडे, पपीता पोलपोलवार, रजिया कुरेशी, सुनीता मॅकलवार, नंदा कोटरंगे, रोहिणी ढोले, उषा गोरंटीवार, माया बुरांडे, माया कोहळे, उषाराणी वनकर, मंजुषा ठाकरे, संगीता जिलकुंटावर, शिल्पा नागूलवार, हंसा मेश्राम आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



