संजय सोनुने यांना ‘महसूल पुरस्कार’ देऊन सन्मानित करा!
सिंदखेड राजा येथील पत्रकार बांधवांची जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे जोरदार मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे महसूल सहाय्यक (सेतू लिपीक) पदावर कार्यरत असलेले श्री. संजय संतोबा सोनुने यांना १ ऑगस्ट ‘महसूल दिना’चे औचित्य साधून उत्कृष्ट सेवेबद्दल ‘महसूल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी, सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवदेन सादर करण्यात आले आहे.
सेवाभावी व लोकाभिमुख कामाची दखल
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संजय सोनुने हे आपल्या पदावर अत्यंत तत्परतेने आणि प्रामाणिकपणे काम पाहत आहेत. सामान्य नागरिकांना आवश्यक असणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, जसे की:, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलीयर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र
, जात प्रमाणपत्र,रहिवासी व मिळकतीचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
या सर्वांचे वितरण वेळेत व सुरळीत व्हावे यासाठी सोनुणे हे नेहमीच तत्पर असतात.
*संकटसमयी धावून येणारे अधिकारी!*
निवेदनात सोनुने यांच्या विशेष उल्लेखनिय कामगिरीचा पाढा वाचण्यात आला आहे:
* तांत्रिक अडचणीतही विद्यार्थ्यांचे वाचवले नुकसान:
गत ३० मार्च २०२६ रोजी (आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस) सेतूच्या सर्व्हर/साईटमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. अशा वेळेस वरिष्ठांची मदत घेऊन आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत एकाच दिवशी तब्बल १९७ प्रमाणपत्रे मिळवून दिली. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टळले.
* विद्युत पुरवठा खंडित असतानाही काम सुरू:
जून महिन्यात प्रवेश प्रक्रियेदरम्यान वीज पुरवठा खंडित झालेला असतानाही सोनुने यांनी मोबाईलच्या टॉर्च/हॉटस्पॉटच्या मदतीने काम अविरत ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळवून दिले.
1जुन2026ते20जुलै2026 कालावधीतील
पर्यत 5408 ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण
* आपत्कालीन व सामाजिक मदत:
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या प्रसंगी त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान प्रसारमाध्यमांशी उत्तम समन्वय साधून अत्यंत जबाबदारीने काम पार पाडले आहे.
पुरस्कार देऊन पाठीवर कौतुकाची थाप टाकावी
संजय सोनुने यांचे काम केवळ शासकीय कर्मचाऱ्यासारखे नसून ते अत्यंत सामाजिक आणि कर्तव्यदक्ष स्वरूपाचे आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या ‘महसूल दिना’च्या निमित्ताने त्यांना महसूल विभागाचा ‘उत्कृष्ट महसूल पुरस्कार’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी सिंदखेड राजातील सर्व प्रमुख पत्रकार बांधवांनी सह्यांच्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.



