ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवाचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, टेकामांडवा (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.अतिदुर्गम व आकांक्षी तालुका म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील या शाळेने यंदाही उत्कृष्ट निकालाची नोंद केली आहे. इयत्ता चौथीमध्ये ९ पैकी ४ विद्यार्थी, इयत्ता पाचवीमध्ये १५ पैकी १३ विद्यार्थी तर इयत्ता सातवीमध्ये १२ पैकी सर्व १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह गाव व तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापक एन. डी. जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दीपक गोतावळे, प्रभाकर पवार, गंगाधर पांचाळ, दीक्षा कांबळे, जयश्री घोळवे व पायल कुकडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल पंचायत समिती जिवतीचे गटशिक्षणाधिकारी संदीप चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण कनोजवार, समिती सदस्य तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा ही नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या SQAAF मूल्यमापनात शाळेला ‘अ+’ मानांकन प्राप्त झाले असून ‘मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामुळे ही शाळा आदर्श शाळा म्हणून उदयास येत आहे.

– संदीप चौधरी गटशिक्षणाधिकारी पं. स जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये