सातत्य, सराव आणि योग्य दिशा हिच यशाची गुरुकिल्ली :- प्रा. रत्नाकर शिरसाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूर यांच्या वतीने “उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विध्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रा.रत्नाकर शिरसाट यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपद्धती तसेच दहावी, बारावी व पदवीनंतर उपलब्ध करिअरच्या विविध संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.व यश प्राप्त करण्यासाठी सातत्य, सराव आणि योग्य दिशा हिच यशाची गुरुकिल्ली असे प्रतिपादन त्यांनी केले.
एकदिवसीय कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून संशोधक व लेखक अविनाश पोईनकर तर अतिथी म्हणून प्रा.अंकित मारगोनवार, सुमित काकडे,सुरज दाहगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत विविध प्रश्न विचारले अविनाश पोईनकर यांनी विध्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, संदर्भ पुस्तके, चालू घडामोडींचा अभ्यास आणि नियमित सरावाचे महत्त्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी स्पर्धा परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन व नियोजन याविषयी मार्गदर्शन करून महाविद्यालयाच्या वतीने अशा उपयुक्त कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. रत्नाकर शिरसाट यांचा माहाविद्यालयच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. छाया गायकवाड यांनी तर आभार कू.हर्षिता शेंडे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.



