ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुंभारी येथे खरीप हंगामातील विविध पिकांमध्ये संतुलित खत व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्या ‘रावे’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी कुंभारी येथे खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संतुलित खत व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, उपप्राचार्य देवानंद नागरे आणि रावे समन्वयक प्रा. मोहजित सिंग राजपूत, अरूण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना खरीप पिकांमध्ये शिफारशीनुसार खतांचा योग्य प्रमाणात व योग्य वेळेत वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचा समावेश आणि पिकांच्या वाढीनुसार खतांच्या मात्रा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे उत्पादनात वाढ होण्यासोबतच जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारले. कृषीकन्यांनी त्यांच्या शंकांचे समाधान करून आधुनिक खत व्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या तृप्ती मोरे, अवंती देशमुख, गौरी सोळंकी, मयुरी झाडे,माधुरी दुणगहु, सायली माने, माधुरी धुनगहु यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये