ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी विक्की देवघरेची सहकाऱ्याला मारहाण 

तहसील कार्यालयात अधिकाऱ्याची गुंडगिरी ; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ येथील अन्नपुरवठा विभागात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका कथित घटनेने संपूर्ण तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे याने सहकारी पुरवठा निरीक्षक कांबळे यांच्या कानशिलात मारहाण आरोप समोर आला असून, देवघरे याच्या गैरवर्तनाने संताप व्यक्त केला जात आहे जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाची जोरदार तयारी सुरू होती. पुरवठा निरीक्षक कांबळे हे शासकीय कामानिमित्त चंद्रपूर येथे गेले होते. भुकेने व्याकुळ झाल्याने सायंकाळी परतल्यानंतर ते कार्यालयातून घरी जायच्या तयारीत होते. तोच विक्की देवघरेचा फोन येतो लगेच कार्यक्रम स्थळी या असे यावेळी कांबळे मी घरी जाऊन जेवण करून लगेच येतो, असे दूरध्वनीवर सांगितल्याचे समजते. मात्र, या उत्तरामुळे संतप्त झालेल्या देवघरे यांनी कार्यालय गाठत कोणतीही चर्चा न करता कांबळे यांना मारहाण केल्याचे कळते. या घटनेमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी काही काळ स्तब्ध झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केल्याची माहिती समोर येत आहे.

देवघरे यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याची चर्चा आहे. नागरिकांशी उद्धट वर्तन, रास्त भाव दुकानदारांना विनाकारण त्रास, तसेच काही प्रकरणांमध्ये पक्षपाती भूमिका, एवढेच नाही तर अंगणवाडी सेविकांच्या रेशनकार्ड प्रकरणापासून ते स्थानिक लोकप्रतिनिधींशी झालेल्या वादांपर्यंत त्यांचे नाव अनेकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवका सोबत झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याचीही माहिती आहे. तरही स्वतःला प्रामाणिक दाखवत असलेले काहींची कामे मात्र ‘टेबलाखालून’ होत असल्याचे नागरिकांचा चर्चेतून कळते. विशेष बाब म्हणजे देवघरे यांची तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी BLO प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तिथे देखील एका शिक्षकासोबत असाच प्रकाराचा वाद घातल्याचेही बोलले जात आहे.

आता स्वतःच्या सहकारी अधिकाऱ्यावर हात उचलल्याचे समोर आल्याने प्रशासनातील शिस्त आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सरकारी कार्यालयात सहकाऱ्याशी अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून प्रशासन कठोर कारवाई करणार का? की हे प्रकरणही दडपले जाणार? याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सीसीटीव्हीमुळे प्रकरणाची सत्यता बाहेर येणार

मारहाणी नंतर या प्रकरणाची रीतसर तक्रार करण्यात आलेली नाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी समज दिल्याची माहिती आहे सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने इतर महसुली कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे तहसील कार्यालयात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे सीसीटीव्ही तपासल्यास या प्रकरणाची सत्यता समोर आणून महसूल प्रशासन मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

(पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आले असल्याने नियोजनच्या कामातील व्यस्ततेमुळे बाचाबाची झाली :- विक्की देवघरे पुरवठा निरीक्षण अधिकारी कोरपणा)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये