ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राचे महसुल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली वसंतराव नाईक परसबागेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नागपूर येथील मनिष नगरातील वसंतराव नाईक परसबागेला महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भेट दिली व उपक्रम समजून घेतले.जमीनीपासून पन्नास फुटापेक्षा जास्त उंचीवर श्रीपतभाऊ राठोड त्यांच्या पत्नी सौ. जयश्रीताई राठोड आणि मुली कु.दिपाली व कु.अंजली श्रीपत राठोड यांच्या परिश्रमातून साकारलेल्या आरोग्यदायी उपक्रमाला महसुल मंत्र्याच्या भेटी दरम्यान परसबागेचे महत्व, उपलब्धी आणि पुढील नियोजनाबाबत श्रीपतभाऊ राठोड यांनी संक्षिप्त माहीती दिली. याप्रसंगी नागपूर नगरीचे बंजारा नायक इंजि.आत्मारामजी चव्हाण,नायकीण मालूताई चव्हाण, पारशिवणीचे कर्तव्यतत्पर संवर्ग विकास अधिकारी मा.सुभाष जाधव, खरबी क्षेत्राचे नायक व सामाजिक कार्यकर्ते मा.पिरूसिंग राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदनिकेतील प्रशांत नेपटे,त्यांची सुविद्यपत्नी अर्चनाताई नेपटे होत्या.परसबागेची पाहणी झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे राठोड परिवाराकडून व बंजारा नायकाकडून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कु.अंजली राठोडनी अत्यावधीत साकारलेला मा.बावनकुळे साहेबांचा फोटो दाखविण्यात आला.ज्ञानप्रकाश लोकसंस्थेच्या कार्याची पुस्तिका दाखवून एक निवेदनही देण्यात आले.याप्रसंगी महसुल मंत्र्यांनी भरीव आश्वासन देवून रविवारला चर्चेसाठी पाचारण केले हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये