दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध
सेलू काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिल्ली येथे सी.जे.पी. चे आंदोलन सुरू असताना दिनांक २० रोजी आंदोलकर्त्या विद्यार्थ्यावर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला त्या घटनेचा सेलू काँग्रेस कमिटी चे वतीने निषेध करण्यात आला असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन सेलूच्या तहसीलदार यांना देण्यात आले
शैक्षणिक सुधारणा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध वैज्ञानिक व शिक्षाविद् सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तसेच आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहचार्जविरोधात सेलू ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
शांततापूर्ण आंदोलनावर लाठीहचार्ज
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना, प्रशासनाने जंतर-मंतरवर प्रदर्शन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर आणि समर्थकांवर लाठीहचार्ज केला, ज्याचा काँग्रेस कमिटीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर ताशेरे
सरकार किंवा कोणत्याही जबाबदार मंत्र्याकडून अद्याप कोणतीही सकारात्मक संवाद साधण्यात आलेला नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या असंवेदनशील व उदासीन कार्यप्रणालीमुळे एका प्रतिष्ठित शिक्षाविद्च्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असून, त्यांच्या प्रकृतीला काही गंभीर हानी पोहोचल्यास ती संपूर्ण देशासाठी अपूरणीय क्षती ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.
देशाच्या विद्यार्थ्यां व शिक्षाविद्बद्दल उदासीन धोरण स्वीकारणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा देऊन,पेपर फूट प्रकरणातील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी व परीक्षा प्रणालीत सुधारणा करून विध्यार्थ्यांना भविष्यात होणाऱ्या परीक्षेत न्याय मिळेल अशी तरतूद करावी.
जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर लाठीहचार्ज करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
असे निवेदन सेलू ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ लोणकर यांच्या नेतृत्वात सौरभ शेळके,रवींद्र वैरागडे, अतुल वैरागडे, बाबा उडान ,निखिल नंदेश्वर, बबन जामनकर, राजेंद्र निमजे, मिलिंद उबाळे,सचिन दूधबडे,शकील पठाण,उमेश नरांजे, भोजराज चलाख, विनोद कैकाडे, परेश देशमुख, नितीन इंगळे, धर्मेद्र कांबळे, अबू बेरा,मुबीन शेख,विष्णू पारसे, बादल पाटील, सागर किरमे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी निवेदन दिले असता ते निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान,यांना पाठविण्याची आग्रह मागणी केली तेव्हा हे निवेदन त्वरित पाठवणार असल्याचे सांगितले.



