ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोजगारात अन्याय, ठेकेदारीतील मनमानीविरोधात साखळी उपोषण तीव्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणीतील IPCA कंपनीत चालतोय मनमानी कारभार स्थानिकांना डावलल्याचा गंभीर आरोप !…तसेच मागील झालेल्या गॅस स्फोट चा IPCA कंपनी चे जनरल मॅनेजर विनायक फडनीस यांनी स्फ़ोटचे कारण आणि कंपनी तील विनाशक धुराचे कारण देण्याची स्थानिकांच्या मागणी करिता हिंगणीतील सामाजिक कार्यकर्ते भाष्करराव मुडे आणि त्यांच्या समर्थकांचे साखळी उपोषण या बाबी कडे स्थानिक प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावकरी च्या वतीने सामूहिक आंदोलन चा इशारा…..

रोजगारात अन्याय, ठेकेदारीतील मनमानीविरोधात साखळी उपोषण तीव्

सेलू तालुक्यातील एकमेव मोठ्या उद्योगावर स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार नाकारल्याचा आरोप • मजुरीत कपात होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मुर्डे पाच दिवसांपासून साखळी उपोषणावर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

हिंगणी (ता. सेलू) सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील IPCA कंपनीच्या कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील युवकांना रोजगार न देता बाहेतील कामगारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.. कंपनीतील कामगार ठेकेदारी अनेक वर्षापासून एकाच ठेकेदाराकडे असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

हिंगणी येथील IPCA कंपनीचे प्रवेशद्वार

साखळी उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मुडे (हिंगणी).

कंपनीकडून मंजूर मजुरीत कपात करून कामगारांना कमी रक्कम दिली जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. कंपनीकडून प्रतिदिन सुमारे ₹600 मंजूर होत असल्याचा दावा असून, प्रत्यक्षात कामगारांना फक्त ₹350 ते ₹400 इतकीच रक्कम मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापन आणि संबधित ठेकेदार यांच्यात साठगाठ असल्याची चर्चा परिसरात होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मुढे हे गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषण करत असून, कंपनीने स्थानिकांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

▶ ठेकेदारामार्फत नव्हे, तर कंपनीमार्फत थेट रोजगार दया वा.

परिसरातील बेरोजगार युवकांना प्राधान्याने नोकरी घ्यावी.

कंपनीसाठी जमीन दिलेल्या शेतकन्यांच्या मुलांना रोजगार घ्यावा.

> कंपनीत घडलेल्या कथित दुर्घटना किंवा स्फोटासंदर्भातील माहिती

ग्रामपंचायत व ग्रामस्थांना पारदर्शकपणे घ्यावी.

मजुरी कपातीच्या तक्रारांची चौकशी करून न्याय घ्यावा.

मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

कंपनीसाठी दिलेल्या जमिनी परत घेण्याचा विचार केला जाईल.

 वरील सर्व बाबी आंदोलकांनी केलेले आरोप व मागण्या आहेत.

IPCA कंपनी किंवा संबधित ठेकेदार यांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये