ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ट महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर :- सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर,येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महानायक, राष्ट्रपुरुष आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा प्रेरणादायी संदेश देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा दिनकर झाडे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य, तसेच कार्यक्रम अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा प्रशांत खैरे सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचे कार्य तसेच अन्यायाविरुद्ध त्यांच्या मनातील चीड आणि युवकांनी नेहमी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सजग राहावे आणि वर्तमान काळातील आव्हानांना युवकांनी गांभीर्याने न डगमगता सामोरे जावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांवर भाषणे सादर केली. त्यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, धैर्य, त्याग आणि देशसेवेच्या प्रेरणादायी विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प सर्वांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ राजेश बोळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा नितीन सूरपाम यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर प्रा. सातारकर सर, प्रा. जहीर सर, प्रा. झाडे सर,प्रा कु ताकसांडे मॅडम, प्रा मेहरकुरे सर,प्रा.सुरपाम सर प्रा. कोल्हे मॅडम, कु. चांदेकर मॅडम, श्री. करन लोणारे, श्री. पिंपळशेंडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये